Farming Insurance : मा. उच्च न्यायालकडून मिळालेल्या सूचना प्रमाणे, पिक विमा कंपनीकडून खरीप २०२० मधील शेतकऱ्यांना तब्बल ११९.५७ कोटी नुकसान भरपाई मिळणार आहे. ३ लाख ५३ हजार ८२४ शेतकऱ्यांना खात्यावर नुकसान भरपाई सोमवार जमा होण्यास सुरूवात होणार आहे. तसेच शेतकऱ्याच्या खात्यावर सतत पावसाचे अुनदान सुध्दा तातडीने जमा होत आहे.
कांदा अनुदान व नियमित कर्जफेड करणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची तरदूत झाली असून या महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात २०१ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या टप्पात शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३ हजार ४७७ रुपये, तब्बल ३ लाख ३३ हजार ५९७ शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा करण्यास सुरुवात झाली आहे. २० हजार २२७ शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनहि निधीची रक्कम जमा करण्यात आली नव्हती परंतू याहि शेतकऱ्यांच्या खात्यात १९. ७७ कोटीचा निधी जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
फक्त धारशिव जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून नुकसान भरपाई तब्बल १३७ रुपये मंजूर करण्यात आले आहे. १ लाख २३ हजार ६९५ शेतकऱ्यांना नुकसान ९७ कोटी पर्यंत मंजूर झाली आहे. १ लाख २३ हजार पैकी ८३ हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ६१. ३५ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात येणार आहे.
पावसाळी अधिवेशनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे ३५० रुपये अनुदान देऊ अशी घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासाठी राज्य सरकारने पहिल्याच टप्यात तब्बल ५५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच धाराशिव जिल्ह्यातील ५ हजार ८५२ शेतकऱ्यांसाठी २२ कोटी २९ लाख रुपायाचे अनुदान हे मंजूर केले असून लवकरच या शेतकऱ्यांच्या जमा करण्यात येणार आहे. वरील सर्व माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.