India Meteorological Department : गेल्या १५ दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. जर पुढील काही दिवसात पावसाची सुरुवात नाहि झाली तर शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ येण्याची दाट शक्यता आहे. परंतू हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. येणाऱ्या दोन दिवसात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होणार आणि तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर अंत्यत कमी असणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी असणार हे हवामान खात्याने अगोदरच सांगितले होते. भारतीय हवामान विभागाने दिलेल्याअंदानुसार राज्यात दोन आठवडे हवामान कोरडे राहिले आहे. परंतू राज्यात गेल्या दोन आठवड्यात पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिंकाना फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
उद्याचे हवामान अंदाज | India Meteorological Department
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. उद्या कोकण भागात आणि विदर्भात बहूतांश भागात ढगाळ वातावरण असणार तसेच हवामान खात्याने या भागात पावसाचा इशारा दिला आहे. मध्यम महाराष्ट्रासह मरावाड्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाज नुसार, मध्यम महाराष्ट्रात तसेच दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात दीसाआड पाऊस होत राहणार आहे. हवामान खात्यानुसार उद्या यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, अमरावती, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने सुरुवात होणार आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुध्दा तूरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच १९ ऑगस्ट पासून राज्यात बहूतांश भागात पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.