India Meteorological Department : आजचा हवामान अंदाज | 18 August

India Meteorological Department : आजचा हवामान अंदाज | 18 August
India Meteorological Department : आजचा हवामान अंदाज | 18 August

India Meteorological Department : वातावरणात बदल होत असल्यामुळे लवकरच राज्यात पावसाचे आगमन होणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात पावसाने दडी मारली होती म्हणून शेतकऱ्यांच्या मनात यावर्षी दुष्काळ पडतो का ? अशी शंका निर्माण झाली होती. परंतू हवामान विभागाने दिलेल्या अंदाज वरून राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल तसेच शेतकऱ्यांच्या पिंकाना पुन्हा जीवनदान मिळेल.

India Meteorological Department | 18 August

गुरुवार पासून मुंबई शहरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच विदर्भात सुध्दा तूरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहण्यास मिळाले आहे. पुढील ४८ तासात मराठवाड्यात तूरळक ठिकाणी पावसाची सुरुवात होईल तसेच उर्वरित भागात आपणास ढगाळ वातावरण पाहयला मिळेल.

भारतीय हवामान विभागाने अगोदरच माहिती दिली होती की, राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी राहिल. त्याच प्रमाणे पहिल्याच आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला आणि दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. राज्यात दोन आठवडे पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

आजचा हवामान अंदाज | भारतीय हवामान विभाग

पावसाचे आगमन कधी होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात आठवड्यात पावसाचे आगमन होणार आहे. १८ ऑगस्ट पासून ते २४ ऑगस्ट पर्यंत विविध ठिकाणी मुसळधार पावसाचे आगमन होणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Farming Insurance : ३ लाख ५३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसार भरपाई जमा होणार
Farming Insurance : ३ लाख ५३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसार भरपाई जमा होणार

Leave a Comment