Maharashtra Rain Update : 9 जिल्ह्यात पाऊस मुसळधार पडणार

Maharashtra Rain Update : 9 जिल्ह्यात मुसळधाार पडणार
Maharashtra Rain Update : 9 जिल्ह्यात मुसळधाार पडणार

 

India Meteorological Department : राज्यात आज ( 19 August ) बहूतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे अनेक ‍ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून राज्यातील शेतकरी अकाशात पाहून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात यावर्षी सरासर ८९ टक्के पाऊस पडला आहे. जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात राज्यात वादळी वाऱ्यासह कमी वेळेत अति मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतू ऑगस्ट महिना लागल्यापासून सलग दोन आठवडे पावसाने उघडीप घेतली होती.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रातील धरण्याची पातळी कमी आहे. या चालू कालावधीत मागील वर्षी ८० टक्के पर्यंत धरणाची पातळी होते. परंतू यावर्षी राज्यात धरणाची पातळी ६१ टक्के पर्यंत असल्यामुळे चिंतेत भर वाढली आहे. महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पावसाची सुरुवात कधी होईल, याकडे राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.

आजचा हवामान अंदाज | Maharashtra Rain Update

भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) तसेच प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाज नुसार राज्यात विविध ठिकाणी पुढील काही दिवस जोरदार पाऊस होणार आहे. हवामान खात्यानुसार आज विदर्भातील नागपूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी केला आहे. नंदूरबार, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्याना वगळून, हवामान खात्याने उर्वरित जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे. मराठवाड्यात सुध्दा हवामान खात्याने आज ( 19 August ) सर्व जिल्ह्यांना येलो अर्लट दिला आहे.

उद्याचे हवामान अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्या २० ऑगस्ट रोजी राज्यातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर मध्ये पावसाचा इशारा दिला आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे. आणि २२ ऑगस्ट पर्यंत कोकण भागात जोरदार पाऊस होऊ शकतो.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Leave a Comment