Onions Market : भारतातील बाजार पेठेत मागील काही दिवसापूर्वी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती परंतू या आठवड्यात अनेक बाजार समिती मध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहयला मिळत आहे. याच पाठी मागचे कारण जाणून घेणार आहोत.
देशातील कांद्याच्या दरात मोठी वाढ होत असल्यामुळे सामन्य लोकांना आणखीन पैसे मौजावे लागतात. जांणकरांच्या मते, सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर आणखीन वाढणार होते. परंतू केंद्र सरकारने एक निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर पुढील दोन महिन्यासाठी शुल्क वाढून लावला आहे. यामुळे कांद्याच्या दरावर नियत्रंण राहणार आहे. कांद्याच्या दरात भाव वाढ रोखण्यासाठी ४० टक्के शुल्क लागू करुन कांद्याच्या दरावर नियत्रंण मिळावले आहे. तसेच ३१ डिसेंबर पर्यंत कांदा निर्यांतीवर ४० टक्के शुल्क लागू राहणार आहे.
कांदाच्या दरात वाढ झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे चांगले दिवस आले होते परंतू केंद्र सरकारच्या एका निर्णयमुळे शेतकऱ्यांना कांदा रडवत आहे. टोमॅटोनंतर भारतात कांद्याच्या भावात मोठी वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकाने बहूतेक हा निर्णय घेतला असावा.
Kandyache bhav vadhane