Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनवर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. पावसाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २५ ऑगस्ट पर्यंत पूर्व विदर्भात ऑरेंज अर्लट जारी केला आहे. आज मुंबई आणि पुणे भागात हलका ते मध्यम प्रकाराचा पाऊस पडू शकतो. पुढील काही तासात मराठवाड्यात आणि विदर्भात रिमझिम पावसाची सुरुवात होईल असा अंदाज हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.
आजचा हवामान अंदाज | Maharashtra Rain Update
आज चंद्रपूर आणि नागपूर मध्ये पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे हवामान खात्याने आज रात्री मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, अकोल, गोंदिया, अमरावती, बीड, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे. जळगावसह मध्यम महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये २१ ऑगस्ट पर्यंत हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे. भारतीय हवामामन खात्याने ( India Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा उत्तर प्रदेशकडे सरकत असल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात भाग बदलत हलक्या प्रकारचा पाऊस होत राहणार आहे.