India Meteorological Department : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण भागात आज २४ ऑगस्ट ( 24 August ) रोजी राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो तसेच उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department
महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे विविध ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्यानुसार आज २४ ऑगस्ट रोजी राज्यात भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचे हजेरी लागणार तसेच उर्वरित महारष्ट्रात बहूतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे.
मिझोराम पासून फिरोजपूर पर्यंत कमी दाबाचा पट्ट पसरलेला आहे. तसेच दिक्षण आसाम पासून ते दक्षिण उत्तर प्रदेश मध्ये कमी दाबाचा पट्ट तयार झालेला आहे. तसेच हवामान खात्यानुसार दक्षिण छत्तीसगड पासून ते रायलसीमा पर्यंत तेथे च्रककार स्थिती असल्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. तामिळनाडू मध्ये कोमोरीन परिसरात मान्सून सक्रीय झालेला आहे.
आज पाऊस पडेल का ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पाऊस पडणार परंतू बहूतांश भागात पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. कोकण भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे परंतू उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच हलका ते मध्यम प्रकाराचा पाऊस पडणार आहे.