India Meteorological Department : गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रातील अनेक भागात चांगल्याप्रकारे पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. विविध भागात १५ दिवसा पेक्षा जास्त दिवस झाले परंतू पावसाने आगमन न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
१८ ऑगस्ट पासून पावसाची सुरुवात झाली परंतू अजूनहि महाराष्ट्रातील विविध भागात पावसाची हजेरी लागली नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती तसेच अनेक गावात व शहरात जनजीवन हे विस्कळीत झाले होते. ऑगस्ट महिना सुरु होताच राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता.
५ ऑगस्ट पासून राज्यात संपूर्ण पणे उघडीप घेतली, त्यानंतर १३ दिवसानंतर राज्यात हलक्या पावसाची सुरुवात झाली तसेच विदर्भात आणि कोकणात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस सुध्दा झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील बहूतांश भागात ५ ऑगस्ट पासून ते आतापर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकऱ्यांनवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.
के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या हवामान अंदाजनुसार, पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे राज्यात पुढील १० दिवस कुठेहि मुसळधार पाऊस पडू शकत नाही. परंतू राज्यातील विविध भागात हलका पाऊस पडत राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल परंतू सध्याच्या परिस्थितीत कोकणात आणि विदर्भात दिलासा देणारा पाऊस होऊ शकतो.
गुजरातच्या दक्षिणकडे कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच २५ ऑगस्ट नंतर कोकण भागात आणि विदर्भात वातावरणात परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.