IMD : पुढील 5 दिवस पावसाचा इशारा नाही

IMD : पुढील 5 दिवस पावसाचा इशारा नाही
IMD : पुढील 5 दिवस पावसाचा इशारा नाही

 

India Meteorological Department : मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर मध्ये तूरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. गेल्या दोन महिन्यापासून पावसाने अनेक ठिकाणी उघडीप घेतली आहे.  जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची सुरुवात झाली होती. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडत होता परंतू ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाने उघडीप घेतली तसेच १८ ऑगस्ट पासून राज्यात हलक्या पावसाची सुरुवात झाली परंतू बहूतांश भागात पाऊस पडलेला नाही.

भारतीय हवामान अंदाज | IMD Weather Forecast

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाज नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही. यावर्षी 2023 राज्यात एल निनोचा प्रभाव असलेला पाहयला मिळत आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही . राज्यात पावसाळा फक्त एका महिन्याचा राहिलेला आहे.

७ जून रोजी पावसाची सुरुवात होईल असे म्हटले जात होते परंतू २५ जून रोजी मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती. तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. खर तर हवामान अभ्यासक यांच्या मते, १३ ऑगस्ट पासून राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात होईल परंतू १८ ऑगस्ट पासून तूरळक ठिकाणी हलक्या पावसाची सुरुवात झाली अजूनहि राज्यात पावसाचा जोर वाढलेला नाही.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात पुढील सलग ५ दिवस पावसाची उघडीप राहणार , बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच पट्ट वायव्य दिशेने गेला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Leave a Comment