Drought 2023 : महाराष्ट्रात १ कोटी ४० लाख हेक्टर वरती २३८ लाख मे. टनाचे उत्पादन मागील वर्षी झाले होते. ऊसाची लागवड सोडली तर महाराष्ट्रात यावर्षी १ कोटी ३८ लाख ६४ हजार हेक्टरवर पेरणी झाली परंतू यावर्षी ऑगस्ट महिन्यात सलग २५ दिवस पावसाचा खंड राहिला आहे. राज्यात पावसाचा मोठा खंड पडला असल्यामुळे सव्वा लाख कोटी पर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
जाणकरांच्या मते, विदर्भ, कोकण, मराठवाड्यातील तूरळक भाग सोडला तर १६ जिल्ह्यात पावसाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांन समोर मोठे संकट उभे राहिले आहे. सोयाबीन ५० लाख हेक्टर, उडीद ८ लाख हेक्टर तसेच ३० लाख हेक्टर वर मूग व कापसाची यावर्षी लागवड करण्यात आली आहे. परंतू या सर्व पिकांना धोका निर्माण झाला आहे.
राज्यात १८ ऑगस्ट पासून पावसाची सुरुवात झाली परंतू ८ जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. तसेच उर्वरीत भागात तूरळक ठिकाणी हलका पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रात सुरुवातीपासून पावसाची कमतरता असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक गावात अनेक तालुक्यात २५ दिवस पाऊस न पडल्याने पिकांनी माना टाकून दिल्या आहेत.
मागील वर्षी १ कोटी ४० लाख हेक्टरवर २३८ लाख मे. टना पर्यंत उत्पादन झाले होते परंतू यावर्षी १ कोटी ३८ लाख हेक्टरवर पेरणी झाली परंतू पावसाचा खंड असल्यामुळे उत्पादन निम्म्याहून कमी होण्याची शक्यता आहे.