IMD Weather Forecast : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यातील मराठवाड्यात भागात तब्बल पाच दिवस पावसाची कमतरता राहणार आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यात फारशी पावसाची शक्यता कमी आहे. १ ते ७ सप्टेंबर मध्ये पाऊस जोरदार नसेल परंतू तूरळक ठिकाणी हलका पाऊस या दरम्यान होत राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात ५ सप्टेंबर पर्यंत हलका पाऊस होत राहिल तसेच तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
IMD Weather Forecast | India Meteorological Department
महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनहि समाधान कारक पाऊस पडलेला नाही. पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात पावसाची कमतरता पाहयला मिळाली आहे. जून महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पुणे जिल्ह्यात तीन महिन्यापासून ते आतापर्यंत फक्त ६६.३ टक्के ( ७६६.७ ) इतका पाऊस झालेला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, देशात पुन्हा मान्सूनची सुरुवात होणार आहे.
तसेच महाराष्ट्रात ५ किंवा ८ ऑक्टोबर तारखेपासून राज्यात मान्सून परतणार आहे. 10 दिवसापूर्वी राजस्थानतून १ ऑक्टोबर रोजी मान्सूनच्या परतीची तारीख होती परंतू मान्सूनच्या लहरी पणामुळे तारीख बदली आहे. २० ऑक्टोबर रोजी राजस्थानातून परतीच्या पावसाची शक्यता आहे.
पूर्व भारतात ऑगस्ट महिन्यात पावसाची कमतरता असल्यामुळे १७ टक्के पाऊस कमी पडला आहे. मध्य भारतात ६ टक्के, दक्षिण भारतात १६ टक्के या भागात पाऊस कमी पडला आहे. परंतू पश्चिम भारतात ८ टक्के पर्यंत अधिक पाऊस असल्याची नोंद आहे. संपूर्ण भारतात आतापर्यंत ७ टक्के पाऊस कमी झाला आहे. जाणंकराच्या मते, सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस होईल तसेच नदी नाले वाहतील पाण्याची पातळी वाढेल.