IMD : 4 आठवड्याचा हवामान अंदाज लगेच पहा

IMD : 4 आठवड्याचा हवामान अंदाज लगेच पहा
IMD : 4 आठवड्याचा हवामान अंदाज लगेच पहा

 

IMD Weather Forecast : यावर्षी खरीप हंगामात पावसाची खुप कमतरता आहे.  अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अनेक जिल्ह्यातील बहूतांश भागात ऑगस्ट महिन्यात पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून गेली आहेत. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पावसाची सुरुवात होइल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभाग | IMD Weather Forecast

हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच ७ दिवसात राज्यात पावसाची सुरुवात होईल. भारतीय हवामान खात्याने ( India Meteorological Department ) पुढील ४ आठवड्याचा दिलेल्या अंदाजनुसार, मराठवाड्यात, कोकण भागात तसेच मध्य भारतात दमदार पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अनेक भागात पावसाची मोठी तूट पडली आहे. तसेच तूरळक भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. हवामान खात्यानुसार, राज्यात सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर हा कमी असणार परंतू दुसऱ्या आवड्यात बहूतांश भागात जोरदार पाऊस पडणार आहे. मागील २७ दिवसात राज्यात ३३ टक्के पाऊस कमी पडला आहे.

सप्टेंबर महिन्यात चांगल्याप्रकारे पाऊस झाला तर उर्वरित शेतकऱ्यांचे पिके चांगली येतील तसेच धरणाची पातळी वाढेल आणि पाणी टचाईचे संकट सुध्दा होईल.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

India Meteorological Department :  24 तासात 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
India Meteorological Department :  24 तासात 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Comment