Maharashtra Rain Update : 24 तासात या भागात पाऊस पडणार

Maharashtra Rain Update : 24 तासात या भागात पाऊस पडणार
Maharashtra Rain Update : 24 तासात या भागात पाऊस पडणार

 

Maharashtra Rain Update : अनेक दिवसांच्या प्रतिक्षा नंतर महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडला आहे. त्यामुळे लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पावसाची सुरुवात झाली आहे. गेल्या का‍हि दिवसापासून राज्यात नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा  लागत आहे.

महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर मुंबई, नवी मुंबई, पुणे या शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासानंतर राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनासह मुसळधार पाऊस पडणार आहे.

तसेच आज पासून अनेक भागात पावसाचा जोर वाढू शकतो, यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल आणि शेती कामाला चालना मिळेल. अनेक ठिकाणी थंड वातावरण होईल आणि नागरिकांची उन्हापासून सुटका होईल. अनेक भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, ४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. जर हा पाऊस झाला तर पिकांना होणारे नुकसान शेतकऱ्यांना टाळता येईल.

उत्तर बंगालच्या उपसागरात उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. मंगळवार पर्यंत कमी दाबाचा पट्ट तयार झाल्यास पुढील काही दिवसात राज्यात पाऊस होऊ शकतो.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात

Maharashtra Rain : 3 सप्टेंबर रोजी 17 जिल्ह्यात पावसाचा इशारा
Maharashtra Rain : 3 सप्टेंबर रोजी 17 जिल्ह्यात पावसाचा इशारा

Leave a Comment