Weather Forecast : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे होण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख हवामान अभ्यासक अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात सकारात्मक संकेत मिळाले आहे. पश्चिम व उत्तर भागात वाऱ्यांची चक्रकार स्थिती असल्यामुळे पुढील काही तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, ८ सप्टेंबर पर्यंत राज्यात हलक्या पावसाचा अंदाज जारी केला होता. तसेच मगील तीन ते चार दिवसापासून घाट माथ्यावर मध्यम ते हलका पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार, ७ सप्टेंबर पर्यंत राज्यातील विविध ठिकाणी पाऊस होईल तसेच मध्य महाराष्ट्रात २४ तासानंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.