
IMD : गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती परंतू हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पावसाची सुरुवात होणार आहे. दोन ते तीन दिवसात राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण तसेच हलक्या पावसाची सुरूवात होण्याची शक्यता आहे.
IMD | India Meteorological Department
उत्तर बंगालच्या उपसागारात वाऱ्यांच्या प्रभावामुळे येत्या दोन ते तीन दिवसात कमी दाबाचा पट्टा तयार होईल. असे जर झाले तर येत्या येत्या आठवड्यात राज्यात धो धो पावसाची सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे पिकांना जीवनदान मिळेल तसेच पिकांचे उत्पादन हि वाढेल.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला तर मध्य महाराष्ट्रासह गोवा, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुढील काही तासात आज रात्री विदर्भात आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणासह आज पुणे, नाशिक, सातारा, भंडारा, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रातील बहूतांश भागात पावसाने उघडीप घेतली तसेच विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे पिके उन्हामुळे जळून गेली आहेत. आज राज्यात पाऊस न पडल्यानमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच सामील होऊ शकतात.
