IMD : मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर हा कमी झाला आहे. आज बहूंताश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. अजूनहि मुसळधार पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना धोका आहे. पावसाळ्यात चांगल्या प्रकारे पावसाचे अगमन न झाल्यास भविष्यात भंयकर पाणी टंचाई भासेल.
आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department
राज्यात ऊन आणि सावलीचा खेळ आज सुरु राहणारच आहे. परंतू भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील २४ तासातनंतर पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने आगमन होणार आहे.
मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे. राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. हवामान खात्यानुसार, आज मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मध्ये बहूतांश भागात पावसाची उघडीप राहणार आहे.
परंतू कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्रात बहूतांश ठिकाणी पाऊस पडेल आणि तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. जाणंकारांच्या मते, आज रात्री पासूनच पूर्व विदर्भात हलक्या पावसाची सुरुवात होऊ शकते. परंतू हवामान खात्यानुसार १४ सप्टेंबर पूर्व विदर्भात तर १५ आणि १६ सप्टेंबर या तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागणार आहे. १६ तारखेपासून सर्वत्र हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस होत राहिल
बंगालच्या उपसागरात बदल झाला | Weather Update
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मान्सूनची प्रगती होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात गुरुवार पासून मुसळधार पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान खात्यानुसार, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मरावाडा, मध्य महाराष्ट्रात १४ सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील या मुसळधार पाऊस पडणार आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group आताच आमच्या ग्रुप वर जॉईन व्हा.