Panjab Dakh Havaman Andaj : हवामान अभ्यासक पंजाब डख शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान अंदाज सांगत असतात व तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात प्रसिध्द पंजाब डख यांचा अंदाज राहतो. पंजाब डख यांनी २० सप्टेंबर २०२३ रोजी शेतकऱ्यांनसाठी पुढील १० दिवसाचा हवामान अंदाज जारी केला आहे.
Marathwada : मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार ?
पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी २१ सप्टेंबर २०२३ रोजी पासून ते २८ सप्टेंबर पर्यंत राज्यातील विविध भागात भाग बदलत पाऊस होत राहणार आहे. बंगालच्या खाड्डीत तीव्र गतीने कमी दाबाचा पट्टा सक्रीय होईल व त्याचा महाराष्ट्रावर होणार आहे. बंगालच्या खाड्डीतला कमी दाबाचा पट्टा प्रथम छत्तीसगड, मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्रात विदर्भात आणि उत्तर महराष्ट्रात तीव्र गतीने प्रवेश करणार आहे. २५ सप्टेंबर पासून ते २८ सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे.
Cotton Rate : कापसाला चांगला भाव मिळण्यास सुरुवात
अतिवृष्टाचा इशारा | Cyclone
बंगालाच्या उपसारात ५ ऑक्टोबर रोजी नवीन चक्रीवादळ तयार होणार, त्याचा मार्ग महाराष्ट्राकडे असल्यामुळे राज्यातील विविध भागात अतिवृष्टी सारखा पाऊस पडू शकतो. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ४ ऑक्टोबर अगोदर सोयाबीन काढून घ्यावी. तसेच ऑक्टोबर महिन्यात पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या खाड्डीत पाठोपाठ चक्रीवादळ तयार होणार आहे.