Farming Insurance : अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अडमाप नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत मदत दिली जाते.
पिक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नाही किंवा मंजूर केला जात नाही. यामुळे याबाबत शेतकरी वारंवार आनंदोलन किंवा तक्रार करत असतात. ज्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले अशा शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. चला तर पाहूया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा ( Farming Insurance ) मंजूर झाला आहे.
32 कोटीचा पिक विमा मंजूर | Farming Insurance
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात सोयाबीन, कापूस असे इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून सुध्दा गेली आहेत. महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी भारपाई दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने ३२ कोटी ७१ लाख इतका पिक विमा मंजूर केला आहे.
शेवटी पिक विमा मंजूर झाला
शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान होऊन सुध्दा शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नव्हता. पण स्वाभिमानी संघटनेने अनेक ठिकाणी आंदोलन करुन शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याचे काम केले आहे. म्हणून शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला तसेच स्वाभिमानी संघटनेच्या हातात यश आले आहे.
Farming Insurance | 503 कोटीचा शेती पिक विमा वाटप सुरु
Farming Insurance : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान जाहिर
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर ?
पिक विमा कंपन्याकडे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करुनही पिक विमा मिळत नव्हता. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. एकाबाजूने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही. तसेच दुसऱ्या बाजूने नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेण्याआगोदरच शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झाला. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३२ कोटी ७१ लाख ७७ हजार ९२२ रुपायाचा पिक विमा मंजूर झाला आहे.
राज्यात पुन्हा गारपटीचा इशारा | नवीन हवामान अंदाज जारी | Weather Update