Weather Forecast : 25 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाची सुरुवात

Weather Forecast : 25 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाची सुरुवात
Weather Forecast : 25 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाची सुरुवात

 

India Meteorological Department : भारतातील अनेक राज्यात यावर्षी खुपच पाऊस कमी पडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सोमवार पासून राजस्थान मध्ये परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात अनुकूल परिस्थिती असल्यामुळे बहूतांश जिल्ह्यांत पाऊस पडू शकतो.

Marathwada : मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार ?

जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात नव्हे संपूर्ण देशात यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाला आहे. अंदाजनुसार, जुलै महिन्यात १० ते १२ दिवस फक्त राज्यात चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे. जून आणि ऑगस्ट महिना कोरडाच गेला तसेच सप्टेंबर महिन्यात तूरळक ठिकाणीच चागंल्या प्रकारे होत आहे. परंतू बहूतांश भागात अजूनहि पावसाने हजेरी लावली नाही.

Cotton Rate : कापसाला चांगला भाव मिळण्यास सुरुवात

मध्य भारतात आणि ईशान्य दिशेत अति मुसळधार पाऊस पडत आहे. परंतू महाराष्ट्रात अजून हि चांगल्या प्रकारे पाऊस होत नसल्यामुळे भविष्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता दाट आहे. सध्याच्या परिस्थितीत पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्यानुसार, अनुकूल वातावरण असल्यामुळे परतीचा पाऊस चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

२५ सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज | India Meteorological Department

तब्बल दीड महिन्यानंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यातील तूरळक ठिकाणी मेघगर्जना होत आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, २५ सप्टेंबर पासून राज्यातील विदर्भ, घाटमाथा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला ?

नगर, अकोला, भंडारा, बुलढाणा, अमरावती, नाशिक, पुणे, जळगाव, रत्नागिरी, धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Weather : पुढील 3 ते 4 तासात 5 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार
Weather : पुढील 3 ते 4 तासात 5 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार

Leave a Comment