Weather Update 2023 : भारतात नैऋत्य मोसमी पाऊस पाठी मागे फिरण्यास उशीर करत आहे. हवामान खात्यानुसार, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मराठवाडा या भागातील अनेक जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे.
Weather Today : 27 सप्टेंबर पर्यंत या भागात पावसाचा जोर वाढणार
IMD | India Meteorological Department | Weather
अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. यामुळे भारतातील दक्षिण भागात आणि मध्य भागात पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसासाठी पोषक वातावरण तयार राहील . आज 27 सप्टेंबर रोजी हवामान खात्यानुसार, गुजरात आणि महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना होणार आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात २८ सप्टेंबर पासून ४ ऑक्टोबर पावसाचा जोर वाढणार आहे.
Weather : 10 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार
छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, अकोला, बीड, हिंगोली, परभणी, जालना, या जिल्ह्यात आज भाग बदलत मुसळधार पावसाचा इशारा दिण्यात आला आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील व्हा