IMD : पुढील काही तासात 4 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

IMD : पुढील काही तासात 4 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
IMD : पुढील काही तासात 4 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

 

IMD : गणपत्तीच्या आगमनानंतर महाराष्ट्रातील विविध भागात दमदार पाऊस पडलेला आहे. गेल्या सात दिवसात विविध भागात पाऊस झालेला आहे. पाऊस झाल्यानंतर अनेक भागातील पिकांना पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. पुढील काही तासात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maharashtra Rain Alert Today | IMD

कोकण ते गोवा किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा हा सक्रीय झाला आहे. यामुळे कोकण तसेच मुंबई आणि गोवा किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. खास करुन आज कोल्हापूर मध्‍ये अतिवृष्टी सारखा पाऊस होऊ शकतो, यामुळे हवामान खात्याने ऑरेंज अर्लट जारी केला आहे. सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे आज येलो अर्लट हवामान विभागाने दिला आहे.

IMD : आज रात्री 4 जिल्ह्यात मुसळधा पावसाचा इशारा

मागील दोन दिवसात सातारा, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलेला आहे. या जिल्ह्यात नदी बंधारे तसेच तलाव भरून वाहत आहेत.

परतीच्या पावसाचे आगमन होणार | Weather

देशातील मान्सून हा संपलेला आहे. आता महाराष्ट्रातील शेतकरी परतीच्या पावसावर अवलंबून आहेत. गुजरात, आंध्रपदेश, मध्य प्रदेश राज्यात हवामान विभागानुसार परतीच्या पावसाची सुरुवात झालेली आहे. २४ तासानंतर राज्यात परतीच्या पावसाची सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहिर केला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच सामील होऊ शकतात.

IMD : पुढील 24 तासात मुंबई पुण्यात होणार राडा
IMD : पुढील 24 तासात मुंबई पुण्यात होणार राडा

Leave a Comment