IMD : मागील सात दिवसात पाऊस मुसळधार पाऊस झाल्याने राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील ४८ तासात महाराष्ट्रातून मान्सून माघारी निघणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
भारतीय हवामान अंदाज | IMD
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच राजस्थान आणि गुजरात मध्यून मान्सूनने निरोप घेतलेला आहे. हवामान खात्याने नुसार, पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय होण्याची शक्यता आहे.
Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर हा ओसरणार आहे. तसेच तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडत राहिल. महाराष्ट्रात तापमानाची वाढ होत जाणार आहे परंतू मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची वाढ पाहयला मिळेल. तसेच विदर्भातील पाच जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मेघगर्जना होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
उद्या पाऊस पडेल का ?
होय, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा या पाच जिल्ह्यात उद्या जोरदार तूरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल तसेच उर्वरित भागात हलका ते मध्यम प्रकाराचा पाऊस होत राहिल.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.