NAMO Shetkari Yojana : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांनी आज झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल तसेच नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे हा हप्ता दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, तसेच 1 हजार 720 कोटी इतका निधी पहिल्या हप्तासाठी मंजूरी दिली आहे.
NAMO Shetkari Yojana | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना काढली त्याच प्रकारे नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी काढलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात त्याच प्रकारे नमो शेतकरी योजने अंतर्गत सुद्धा सहा हजार रुपये मिळणार आहे. म्हणजेच राज्य सरकारची योजना आणि केंद्र सरकारची योजना दोन्ही मिळून गरीब शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपये दिले जाणार आहे.
IMD : पुढील 24 तासात अति मुसळधार पावसाचा अंदाज
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत लवकरच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील. एप्रिल 2023 ते जुलै 2023 या कालावधीसाठी पहिला हप्ता राज्य मंत्रिमंडळाने अगोदरच मंजुरी दिलेली होती. यासाठी 1 हजार 720 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत होती. त्याच प्रकारे तरतूद झालेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता जमा होईल. NAMO Shetkari Yojana