Govt Yojana For Farmers : शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट, शेतकरी मित्रांनो शासनाकडून नवनवीन योजना राबवल्या जातात. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा व संकटावर शेतकऱ्यांनी मात करावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार नवनवीन योजना राबवत असतात याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना | Govt Yojana For Farmers
सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत प्रत्येकी वर्षी शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये दिले जातात यामुळे शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळतो. तसेच राज्य सरकारकडून सुद्धा नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जाणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत प्रत्येकी तीन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात, असे तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा केला जातो. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरावा हप्ता जमा होणार आहे.
IMD : येत्या 2 दिवसात पाऊस परतणार
गेल्या जुलै महिन्यात 27 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हप्ता जमा केलेला आहे, आत्तापर्यंत 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे.
पीएम किसान मानधन योजना | Govt Yojana For Farmers
पीएम किसान मानधन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षी तीन हजार रुपये दिले जाणार आहे, या योजनेबाबत सर्व शेतकऱ्यांना माहिती असावी, यासाठी हा लेख लिहिला गेला आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेचा भरपूर फायदा घेऊ शकतात, जेव्हा शेतकरी साठ वर्षाच्या पुढे जातो त्यावेळेस त्यास प्रत्येकी दर महिन्याला तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन एकर पेक्षा कमी शेत जमीन पाहिजे.
पंतप्रधान पिक विमा योजना | Govt Yojana For Farmers
पंतप्रधान पिक विमा योजना याबाबत सर्वच शेतकऱ्यांना माहिती असेल या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती किंड्या रोगांचा प्रादुर्भाव पिकावर झाला तर यासाठी संरक्षण या योजनेअंतर्गत देण्यात येते. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान नुकसान भरपाई मिळते, राज्य सरकार आणि केंद्र सरकार 50% प्रीमियम सबसिडी शेअर करत असतात तसेच या तीन योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा घेतला पाहिजे.
आपला बळीराजा व्हाट्सअप ग्रुप वर आत्ताच शामिल व्हा