Drought : 42 तालुक्यात दुष्काळ पडलेला आहे. या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून प्रशासकीय ऐवजी राज्य शासनाला काम करावे लागत आहे. प्रशासकीय प्रक्रिया ही राज्य शासनाला पार पाडावी लागत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिली कळ संपलेली आहे, आता लवकरच कमी कालावधीत दुसरी कळ संपेल, दुसरी कळ संपल्यानंतर दुष्काळ जाहीर घोषित होण्याची शक्यता आहे.
पहिल्या कळ मध्ये आढळले की 194 तालुक्यात पावसाचा खंड, पेरणीसाठी अडथळे तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला पाहायला मिळाला आहे. यामुळे ही संख्या वाढली होती. परंतू दुसऱ्या कळ मध्ये 42 तालुक्यात पाण्याची पातळी ही खालवली आहे तसेच त्या भागात पावसाची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे पाणी टंचाई हि एक गंभीर समस्या निर्माण होणार आहे.
15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात लवकरच दुष्काळ | Drought
15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात दुष्काळ पडलेला असून या तालुक्यांना केंद्र शासनाकडून मदतीची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारला दुष्काळ अधिकृतपणे घोषित करावे लागेल त्यानंतर केंद्र शासनाकडून मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्य शासनाला वरील सर्व प्रकीया ३० ऑक्टोबर पूर्वीच करुनच मंत्रिमंडळा समोर माडवा लागणार त्यांनतर दुष्काळ घोषित होईल अशी दाट शक्यता आहे.
द्वितीय कळ असणारे तालुके
धुळे : शिंदखेडा
नंदुरबार : नंदुरबार
नाशिक : मालेगाव, येवला, सिन्नर
जळगाव : चाळीसगाव
पुणे : वेल्हा, शिरुर, पुरंदर, इंदापूर, मुळशी, बारामती, दौंड
सोलापूर : सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी
सातारा : खंडाळा, वाई
सांगली : खानापूर वीटा, मीरज, कडेगाव, शिराळ
कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, सोयगाव
बीड : वडवणी, धारुर, आंबाजोगाई
लातूर : रेणापूर
धाराशिव : वाशी, धाराशिव, लोहारा
बुलडाणा : लोणार, बुलडाणा