Cotton Rate : जागतिकस्तरावर कापसाच्या भावात मोठी घसरण पाहयला मिळत आहे. गेल्या दोन तीन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना त्वच्या रोगांचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांनकडे फक्त ४० टक्के कापूस
काही जांणकार सुरुवातील पासून सांगत होते की, कापसाचे भाव १० हजार १२ हजार पर्यंत जातील असा अंदाज सांगत होते. पण आता जागतिकस्तरावर कापसाचे १ हजार ५०० ते २ हजार रुपयांनी भाव कमी झाले आहे. सध्या महाराष्ट्रात सरासर कापसाला भाव ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० पर्यंत मिळत आहे.
२०२१ ते २०२२ मध्ये कापसाला १३ हजार पर्यंत भाव मिळाला आहे. याहि वर्षी कापसाला भाव १० हजार पेक्षा जास्त मिळेल या आशाने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली होती. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कापसाचे भाव वाढतील असे संकेत मिळत नाही. कापसापासून त्वचा रोग होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता खिशातून पैसे मोजावे लागत आहे.
मागील १० दिवसात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक गरज असल्यामुळे, घरातील कापूस विकत आहे. पण विकायला परवडत नाही असे हि शेतकरी सांगत आहे.
बाजारपेठेत जवळपास ६० टक्के कापूस पोहचला आणि शेतकऱ्यांनकडे ४० टक्के कापूस अजून आहे असा दावा काही जांणकार करत आहे. शेतकऱ्यांनी खुप दिवस संयम ठेवला पण शेवटी कापसाचे भाव वाढले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे, केंद्र सरकारने ऐनवेळी कापसाची आयात केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव हे कमी झाले आहे.