Fever : ताप आल्यास घरगुती उपाय | ताप आल्यावर काय खावे – काय खाऊ नये ?

Fever : नमस्कार मित्रांनो, कोणताही आजार शरीरासाठी चांगला नसतो, जर तुम्ही तो आजार शरीरावरच सहन केला तर तुम्हाला त्याचे पुढे चालून गंभीर परिणाम दिसतील, त्यामुळे त्यावरती लवकरात लवकर उपाय केला तर तो आजार बरा होऊ शकतो. मित्रांनो दिवस भरात आपण अनेक वेळा उन्हात काम करतो त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान कमी जास्त होते. काही वेळेस आपल्याला साधरण ताप येतो, आपण लगेच डॉक्टारांनकडे जात नाही. तो आजार आपण आपल्या शरीरावरच सहन करतो. पण साधरण ताप ( Fever ) जरी असला तरी त्यावरती घरगुती उपाय ( Home Remedies ) केला पाहिजे नाहीतर हा ताप ( Fever ) पुढे चालून गंभीर स्वरुपाचा बनू शकतो.

Fever

 

Fever – ताप आल्यास घरगुती उपाय

१) पाणी – प्रथम ताप आल्यावर आपल्या मध्ये अशक्ता पणा येतो त्यामुळे तुम्ही जास्त पाणी प्या, कारण त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. त्यासोबत सरबत सुध्दा पिऊ शकता.

२) भूक – ताप आल्यावर भूक लागत नसेल किंवा खाण्याची इच्छा होत नसेल तर तुम्ही दोन चमचे जिरे घेऊन एका वाटीत रात्रभर पाण्यात भिजून ठेवणे आणि सकाळी ते पाणी गाळून त्यात थोडीशी सार किंवा गुळ टाकून पाणी प्यावे.

३) मोकळे पणा – ताप आल्यावर तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करु नका कारण त्यामुळे तुम्हाला सर्दी होणाची शक्यता वाढते. ताप आपल्यावर तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ करा कारण ज्यामुळे तुम्हाला आराम तसेच शरीराला मोकळे पणा मिळतो.

४) थंडी वाजणे – ताप आल्यावर थंडी सुध्‍दा वाजते त्यामुळे तुम्ही मिऱ्याचे दहा दाने आणि तुळसीचे दहा पानाचे मिश्रन तयार करुन पाण्यासोबत घेणे. असे तुम्ही १० दिवस करावे.

५)  थंड पाण्याची सुती कापड – थंड पाण्याची बादली घ्यावी आणि त्यात सुती कापड भिजवून त्यास पिळवून डोक्यावर लावा, जेणेकरुन ताप उतरणात मदत होते.

६) मध – कोमट पाण्यात मध टाकूप प्यावे, यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होऊन प्रतिकारकशक्ती वाढते.

७) झोप – ताप आल्यावर संपूर्ण झोप घेण्याची गरज आहे.

 

Diet For Fever – ताप आल्यावर काय खावे ? 

१) भाजीपाला – वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खावे जेणे करुन तुमच्या मधील अशक्तपणा कमी होईल आणि प्रतिकारक शक्ती वाढले ज्यामुळे तुमच्या मधील ताप कमी होईल.

२) तांदळाचा भात – ताप असल्यावर तुम्ही भात खावे कारण हे हलके अन्य आहे. त्यामुळे तुम्हाला अन्न पचायला सोपे जाते.

३) हळदीचे दूध – ताप असल्यावर एक कप दुध घेऊन त्यात तुम्ही अर्ध चमचा दुधात मिसळावे आणि रात्री झोपताना प्यावे. यामुळे तुमच्या शरीरातील ताप कमी होईल.

४) फाळे – सफरचंद, केळी, बीट असे इतर फाळांचे जूस किंवा असेच फळे तुम्ही खाऊ शकतात.

५) अंडी – अंडी खाल्याने तुमच्या मध्ये प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

6) जेवण – भात किंवा भाकर तुम्ही खावे कारण ताप असल्यावर पचनशक्ती मंदवली असते.

७) गरम पाणी, तूप, दुध, तांदूळ, कारले, पालक भाजी, मोसंबी, मसूर असे इतर पदार्थ ताप आल्यावर खावे.

 

Fever – ताप आल्यावर काय खाऊ नये ?

1) तेलकट पदार्थ

२) मसाले पदार्थ 

३) अंबट पदार्थ 

4) फास्टफूड 

5) थंड पदार्थ 

ताप असताना वरील पाच पदार्थ खाऊ नयेत.

६) आंबा, चिकू, अननस, कोबी, सिमला मिरची, टोमॅटो असे इतर पदार्थ ताप असताना खाऊ नयेत.

७) गहू, चवळी, मटार असे इतर जड पदार्थ ताप असल्यावर खाऊ नये.

best teeth whitening for sensitive teeth : दात पांढरे शुभ्र करण्यासाठी उपाय

( सूचना : वरील माहितीची जबाबदारी आपला बळीराजा घेत नाही. ही माहिती लहान मुलांन साठी नाही. )

Leave a Comment