Onions : कांदा उत्पादकांना खुशखबर | अनुदानात केली मोठी वाढ

Onions : महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करत, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम येणार आहे.

onions
onions

तसेच शासकीय आधिकारी आणि भारतीय किसान सभेच्या नेत्यांची संयुक्त समिती नेमणार अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. मागील गुरुवारी सायंकाळी भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली आहे. भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळ सोबत आणि इतर अधिकारी त्यात सामिल होऊन याबाबत अडीच तास चर्चा केली आहे.

अडीच तासात १४ मुद्यावर सरकारने चर्चा केली आहे. घेतलेल्या निर्णयावर सरकार तातडीने अंमलबजावणी करणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कांद उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात ५० रुपयांनी वाढ केली असे हि माहिती दिली आहे.

Onions Price : आजचे कांद्याचे भाव

आमदार जे. पी. गावित म्हणतात की, महाराष्ट्र सरकारने बहूतांश मागण्या मान्य केले असले तरी आमच्या आणखीन मागण्या आहेत. यावरती आमचे समाधान होणार नाही.

Leave a Comment