KDS 726 soybean variety : फुले संगम 726 विविधता

KDS 726 soybean variety : नमस्कार शेतकरी मित्रांनो KDS 726 बद्दल माहिती पहा. KDS 726 soybean variety म्हणजे फुले संगम होय. सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फुले संगम KDS 726 वरदान ठरले आहे.
 
KDS 726 soybean variety : फुले संगम 726 विविधता
KDS 726 soybean variety : फुले संगम 726 विविधता

726 सोयाबीनचे वाण :  ( KDS 726 soybean variety )

KDS 726  सोयाबीनचे वाण आहे. 2016 मध्ये शेतकऱ्यांन समोर पहिल्यांदा सोयाबीनचे वाण ( KDS 726 ) समोर आले होते. 

माहात्मा फुले कृषी विद्यापीठ 2016 मध्ये शेतकऱ्यांसाठी फुले संगम ( KDS 726  soybean variety) सोयाबीन वाणाचे प्रसारण केले होते. खास करून बागायतदारांना शेतकऱ्यांना हे सोयाबीनचे वाण घेण्यास शिफारस करण्यात आली होती. 

भारतात तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू अशा इतर राज्यात फुले संगम KDS 726 ची लागवड केली जाते. 

 

726 soybean variety वैशिष्ट्ये 

2016 साली शेतकऱ्यांनी फुले संगमची लागवड खुपच कमी केली होती. तब्बल पाच वर्षांत फुले संगम शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय आहे. 
 
मार्केट मध्ये ( KDS 726 soybean variety ) फुले संगमची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांनी फुले संगम लागवड केल्यानंतर मेहनत तितकेच घेतात पण उत्पादन दुप्पट मिळते. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये फुले संगमची मागणी वाढली आहे. 
 
काही शेतकऱ्यांनी KDS 726 soybean variety लागवड केली आहे त्यांच्या अनुभव नुसार 18 क्विंटल पासून ते 30 क्विंटल ( प्रति हेक्टर ) पर्यंत तुम्ही उत्पादन घेऊ शकतात. 
 
फुले संगम मध्ये 38.14 टक्के प्रोटीन आणि 18.42 टक्के तेलाचे प्रमाण आहे. या साठी परिपक्व कालावधी 100 ते 105 दिवस साधारण पणे लागतात. 
 
फुले संगम ( KDS 726 )  सोयाबीनच्या दान्यावर जांभळे टिपके रोग प्रतिबंधक असते. KDS 726 soybean variety विशेष म्हणजे यावरती खोड माशी आणि तांबेरा रोग यांचा प्रभाव फुले संगम वर कमी जाणवत असतो. 

 

Leave a Comment