Advance Crop Insurance : यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने ऑगस्टमध्ये शेतीचा हंगाम खराब झाला, पंतप्रधान पीक विमा योजना या विशेष शासकीय कार्यक्रमांतर्गत या वेळी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई देण्याचा नियम जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.
कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०५ कोटी ४० लाख रक्कम टाकली आहे. परंतू संगणक प्रणालीत काही अडचणींमुळे १ लाख ८६ हजार ६०७ शेतकऱ्यांन पैकी २६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे राहिले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार | Advance Crop Insurance
अकोला जिल्ह्यात पावसाळ्यात वेळेवर पाऊस न झाल्याने. अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असलेले, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्टमध्ये सोयाबीनची झाडे वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यात होती – काही फुलू लागली होती आणि काही शेंगा तयार होत होत्या. परंतू, जिल्हा समितीने शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना 25% टक्के नुकसान भरपाई देण्याची सूचना कंपनीला सांगितले, कारण त्यांना वाटले की पावसाअभावी सोयाबीनचे उत्पादन होणार नाही.
यानंतर या महिन्यात कंपन्यावर कारवाई झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १ लाख ८६ हजार ६०७ शेतकऱ्यांनच्या खात्यात १०५ कोटी ४० लाखा पर्यंत नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे. उर्वरित २६ हजार शेतकरी प्रतिक्षा करत आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.