IMD : महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कहर सुरूच आहे. दरम्यान, दुपारचे तापमान काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाहयला मिळत आहे. पुढील आठवड्यात महारष्ट्रातील तूरळक भागात ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रात सध्या परिस्थितीत तापमानात चढ-उतार पाहयला मिळत आहे. राज्यासह उत्तर भारतात थंडी वाढली आहे. भारतातील उत्तरच्या काही भागात किमान तापमान कायम आहे. भविष्यात हवामान कसे असेल याबाबत बोलताना हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले,
पश्चिम वादळाने संपेल. कोकण वगळता, महाराष्ट्रात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस आणि मुंबई आणि कोकणात 17 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
29 डिसेंबर रोजी, उत्तर भारतातून येणाऱ्या पश्चिम मान्सूनची उच्च पातळीची थंडी आणि दक्षिण भारतातून महाराष्ट्रात येणारे पहाटेच्या पूर्व वारे यांच्या संयोगामुळे मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या तीन दिवसांत खान्देश, नाशिक, नगर ते सोलापूर आणि धाराशिव आणि लातूर अशा 12 जिल्ह्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता तसेच काहीशी थंडी गायब होऊन उबदारपणा जाणवेल.
मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र पाऊस पडल्यास मध्य प्रदेश लगतच्या खान्देशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्यातील विविध भागात तूरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचेही खुळे यांनी सांगितले.