Cotton Market : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह इतर राज्यात कापसाचे भाव हे उतरत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मध्ये चर्चा वाढली आहे. मागील आठवड्यात २०० ते ५०० रुपयांनी कापसाचे भाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात कमी झाले आहेत.
cotton |
देशात Cotton निर्यात वाढली
मागील ५० ते ६० दिवसात भारतात कापसाच्या दरात चढउतार पाहयाला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रात कापसाला ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंत कापसाला दर मिळत आहे. भारतात कापसाचे दर हे घटल्यामुळे देशात कापसाची निर्यात वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर कमी आहेत. भारतातील कापूसाचे दर हे अति वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील कापसाला मागणी येत नाही असे काही जांणकरांच मत आहे.
दुसऱ्या बाजूने काही जांणकरांच मत, अनेक देशात कापसाचे उत्पादन हे घटलेले आहे. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढेल तसेच दरात सुध्दा सुधारणा होईल असे निर्यातदार म्हणतात.
कापसाचे भाव वाढणार ( Kapsache bhav )
भारतात सध्या कापसाचे दर हे कमी असल्यामुळे पाकिस्तान, बांग्लादेश तसेच पुढे चीनकडून सुध्दा कापसाची मागणी हि वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कापसाला तूफान भाव मिळल्याने यावर्षी सुध्दा कापसाला चांगल्याप्रकारे दर मिळेल, यामुळे शेतकरी कमी दरात कापूस विक्री करत नाही.
भारतात यावर्षी अनेक राज्यात अतिवृष्टी झाली होती तरही बऱ्यापैकी कापसाचे उत्पादन झाले. तसेच इतर देशात अतिवृष्टी झाल्यामुळे तेथे कापसाचे उत्पादन घटलेले आहे. मागील वर्षा पेक्षा यावर्षी कापसाचा वापर वाढणार असल्यामुळे हा कापूस पुरेसा नाही असे जांणकरांच मत आहे.
तसेच भारतातील कापड उद्योगांना कापूस कमी दरात पाहिजे पण शेतकरी कमी दरात कापूस विकत करत नाही. जांणकरांच्या मते, भारतातील कापूस हा चीनच्या नजरेत हा महाग आहे. त्यामुळे चीन कापसाची मागणी करत नाही.
तसेच पाकिस्तानकडून कापसाची निर्यात कमी होत आहे याचे मुख्य कारण पाकिस्तान मध्ये अर्थव्यवस्था बिघडली आहे. कापूस अभ्यासकांच्या मते, कापसाचे दर भविष्यात वाढू शकतात पण कापसाचे भाव नाही वाढल्यास तरीही कापसाचे दर हे कमी होण्याची शक्यता आहे.
कापसाचे भाव का वाढणार ?
मागील वर्षी भारताने ४३ लाख कापसाच्या गाठी निर्यात केल्या होत्या तसेच यावर्षी सुध्दा भारताने आतापर्यंत २ लाख कापसाच्या गाठी निर्यात केल्या असे म्हटले जात आहे. सीएआयन च्या मते ३० लाख गाठी निर्यात झाल्याचा अंदाज सांगितला आहे. तसेच भारतात कापसाची निर्यात हि वाढण्याची शक्यता आहे.
देशात सुतगिरण्यांनी तसेच उद्योगांकडून खरेदी केला जात आहे. त्यामुळे सुध्दा कापसाच्या दरात सुधारण होऊ शकते. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अमेरिकासह इतर देशात सुध्दा कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे. असे जाणंकरांच मते आहे.