Crop Insurance : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामात हवामानाच्या असंतुलनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान कमी करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील 98 हजार 372 शेतकर्यांचा आगाऊ पीक विमा मंजूर झाला आहे. त्यापैकी 61 हजार 820 शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 कोटी 70 लाख 88 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
आगाऊ पीक विमा वर्गीकरणाचे काम सुरू झाले
दिवाळीनंतर सुमारे महिनाभरानंतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आगाऊ पीक विमा जमा करण्याचे काम सुरू झाले. सध्या 61 हजार 820 शेतकऱ्यांच्या खात्यात 16 कोटी 70 लाख 88 हजार रुपये जमा झाले आहेत. 14 हजार 993 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 कोटी 67 लाख 5 हजार रुपये थकबाकी आहे.
दुसऱ्या टप्प्याची घोषणा कधी होणार?
सांगली जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार ८४४ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. पहिल्या टप्प्यात ९८ हजार ३७२ शेतकरी पात्र ठरले आहेत. आता दुसऱ्या टप्प्याची घोषणा कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यात आगाऊ पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या
ज्या शेतकऱ्यांनी 75 टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी केली नाही: 10707
प्रतिकूल हवामान: 66106
पहिल्या टप्प्यात आगाऊ पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम
ज्या शेतकऱ्यांनी 75 टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी केली नाही : 5 कोटी 57 लाख 36 हजार
प्रतिकूल हवामान : 13 कोटी 80 लाख 6 हजार
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
आगाऊ पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.