Farmer Update : नापिकी, अवकाळी पाऊस आणि महागाई यामुळे शेतकऱ्यांची ही व्यथा आहे. हवामानातील चढउतार व अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन घटले आणि भावही घसरले. त्यामुळे पीक कर्ज फेडायचे कसे, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
गतवर्षी वसमत तालुक्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली होती. याशिवाय कापसाचा पेराही वाढला. यंदा जून महिन्यातच पावसाची स्थिती ओसरू लागली. तसेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत जोरदार पाऊस झाला. सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली.
सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा सरासरी भाव 4450 रुपये प्रतिक्विंटल आहे. कापूस सात हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. गतवर्षी कापूस नऊ हजार रुपयांवर गेला होता. त्यानुसार यंदा कापसाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
शेतकरी बालाजीराव काळे सांगतात, “सध्या शेती करणे अवघड झाले आहे. वातावरण साथ देत नाही आणि मजुरीही वाढली आहे. अशा वेळी शेतीमालाला भाव मिळणे गरजेचे आहे.”
शेतकरी साईनाथ पतंगे सांगतात, “शेतकरी दिवसरात्र शेतात काम करून एक पैसा कमावत आहेत. पण शेतमालाला हवा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे आता नापीक जमीनच बरी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. .
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.