India Meteorological Department : विदर्भात पावसाला पोषक हवामान | उद्याचे हवामान अंदाज

India Meteorological Department : विदर्भात पावसाला पोषक हवामान | उद्याचे हवामान अंदाज
India Meteorological Department : विदर्भात पावसाला पोषक हवामान | उद्याचे हवामान अंदाज

 

India Meteorological Department : विदर्भात पुढील काही दिवसांत पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, 23 फेब्रुवारीपासून विदर्भात ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आजचा हवामान अंदाजा | India Meteorological Department,

आकाश निरभ्र झाल्यानंतर राज्यात जोरदार वारे वाहत आहेत. दिवसा उन्हाचा तडाखा वाढला असून कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. आजही (दि. 22) किमान आणि कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहेत. शनिवारपासून (२४) विदर्भात पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
कमाल तापमानाने 35 अंशांचा टप्पा ओलांडल्याने राज्यात उकाडा वाढला आहे. बुधवारी (ता. 21) सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान 15 अंशांच्या खाली आहे, तर धुळ्यातील कृषी शाळेत राज्यातील सर्वात कमी तापमान 9.4 अंशांवर नोंदवले गेले. आजही (दि. 22) उन्हाचा कडाका कायम राहणार असून मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात जोरदार वारे वाहत आहेत

बुधवारी (ता. 21) सकाळपर्यंतच्या 24 तासांत पंजाबमधील अमृतसरमध्ये देशातील मैदानी भागाच्या तुलनेत 6.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतात 180 नॉट्सचे जोरदार वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातही जोरदार वारे वाहत आहेत. दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश ते विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भात शनिवारपासून (ता. 24) पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Cotton Market : कापूस बाजारात 'कस्तुरी ब्रँड'ची एन्ट्री
Cotton Market : कापूस बाजारात ‘कस्तुरी ब्रँड’ची एन्ट्री

Leave a Comment