PM Kisan : केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात १९४३ कोटी ४६ लाख रुपये येणार आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चार हजार रुपयांच्या समतुल्य ३७९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.
28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भरी येथे एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी तीन हप्ते दिले जाणार असून त्यासाठीची तयारी थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आली आहे. हा कार्यक्रम केंद्रीय कृषी विभाग आणि राज्य सरकार यांनी आयोजित केला आहे.
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे मिळणार आहे. पंधराव्या हप्त्याच्या तुलनेत २ लाख ३३ हजार शेतकरी सामील झाले असून या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली होती.
त्यानुसार पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यात 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंघ निधीचा लाभ देण्यात आला. त्यासाठी १७१२ कोटी रुपये वितरित करण्यात आले. आता राज्य सरकारने दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटी रुपये आणि तिसऱ्या हप्त्यासाठी 2000 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे हे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.