Crop Insurance : दुष्काळ‍ भागातील शेतकऱ्यांना 243 कोटीची मदत जाहिर

Crop Insurance : दुष्काळ‍ भागातील शेतकऱ्यांना 243 कोटीची मदत जाहिर
Crop Insurance : दुष्काळ‍ भागातील शेतकऱ्यांना 243 कोटीची मदत जाहिर

 

Crop Insurance : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने २४३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत पालकमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील मालेगाव, येवला आणि सिन्नर या तीन तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही रक्कम वाटप करण्यात येणार आहे. ही मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खूप उपयोगी ठरणार आहे. याशिवाय राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

राज्यातील अपुऱ्या पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता 2023 च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने 2 हजार 443 कोटी 22 लाख 71 हजार रुपयांची रक्कम वाटप करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी (२९) जारी करण्यात आला.

याचा फायदा जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर तालुक्यांना होणार आहे. मालेगाव तालुक्याला 108 कोटी 92 लाख 33 हजार रुपये, सिन्नर तालुक्याला 75 कोटी 81 लाख रुपये, येवला तालुक्याला 63 कोटी 33 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, इतर तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकरीही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

मालेगाव तालुक्यातील 10 लाख 19 हजार 12 शेतकऱ्यांना या दुष्काळ निधीचा लाभ मिळणार आहे. त्यात 2 हेक्टर क्षेत्रावरील 1 लाख 6 हजार 795 तर 2 ते 3 हेक्टर क्षेत्रावरील 6 हजार 566 क्षेत्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासन निर्णयानुसार पावसाची कमतरता, उपलब्ध भूजलाचा ऱ्हास, टेली सेन्सिंग निकष, वनस्पती निर्देशांक, जमिनीतील ओलावा, पेरणी केलेले क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व बाबी विचारात घेऊन जून ते सप्टेंबर या कालावधीत दुष्काळ जाहीर करण्यात आला.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Cotton Rate : जुलैनंतर कापसाचे भाव खरेच घसरतील का?
Cotton Rate : जुलैनंतर कापसाचे भाव खरेच घसरतील का?

 

Onion Export : कांद्याचा खेळ खराब
Onion Export : कांद्याचा खेळ खराब

Leave a Comment