Rooftop Solar System : मोफत वीज | 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान

Rooftop Solar System : मोफत वीज | 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान
Rooftop Solar System : मोफत वीज | 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान

 

Rooftop Solar System : बारामती – घराघरात रुफ टॉप सोलर सिस्टीम बसवून 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत रु. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे.

पावडे म्हणाले, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी ही योजना तातडीने लागू करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत.

रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळतात. वीज ग्राहकांनी बसवलेल्या रूफ टॉप सोलर सिस्टीमची क्षमता विचारात न घेता प्रति ग्राहक कमाल एकूण अनुदान रु 78,000 निश्चित केले आहे.

महावितरण महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना रूफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यासाठी मदत करते. ग्राहकांना https:// pmsuryagarh.gov. in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही उपलब्ध आहे. देशभरातील एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून, राज्यातील ग्राहकांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा.

एक किलोवॅट क्षमतेची रूफटॉप सोलर सिस्टीम दररोज सुमारे चार युनिट किंवा महिन्याला 120 युनिट वीज निर्माण करते. दरमहा 150 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरासाठी दोन किलोवॅटपर्यंतची छतावरील सौर यंत्रणा पुरेशी आहे. दरमहा 150 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची यंत्रणा पुरेशी आहे.

सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्यासाठी घराच्या छतावर रुफ टॉप सोलर पॉवर जनरेशन प्लांट बसवून त्या विजेचा वापर करून घराची विजेची गरज भागवण्याची योजना आहे. यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाल्यास वीज बिल शून्य होते, म्हणजेच वीज मोफत दिली जाते आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

आपला बळीराजा : WhatsApp group वर सामील होऊ शकतात.

Online loan : ऑनलाईन कर्ज खबरदारीने घ्यावे ?
Online loan : ऑनलाईन कर्ज खबरदारीने घ्यावे ?

 

Onions Market : केंद्र सरकार आता शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार ?
Onions Market : केंद्र सरकार आता शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार ?

 

Farmer Electricity | शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपायांत वीज मिळणार
Farmer Electricity | शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपायांत वीज मिळणार

Leave a Comment