Farming Insurance : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १५ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेच्या पाठोपाठ मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एप्रिलनंतर १६ कोटी रुपये वाटण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सन्मान निधी | Farming Insurance
१ फेब्रुवारी २०१९पूर्वी ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळत होता तसेच त्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती जमीन असणे आवश्यक आहे, अशा शेतकऱ्यांनाच मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात नवीन आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटूबांतील एका प्रमुख व्यक्तीला पत्नी व १८ वर्षांखालील दोन अपत्य असेल तर त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळतो. कुटूंबातील प्रमुख व्यक्तीला वर्षांतून तीन वेळा २ हजार रुपायचा हप्ता येतो.
मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची शेत जमीन लागवड क्षेत्राखाली असणे बंधनकारक आहे. या योजनअंतर्गत क्षेत्राची मर्यादा नसून, पण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जे नियम लागू केले आहेत तेच नियम मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत राहणार आहे.
शेतजमीन प्रमुख व्यक्तीच्या नावावर बंधनकारक आहे तसेच ई केवायसी पूर्ण पाहिजे. बॅंक खात्याला आपला आधार नंबर लिंक पाहिजे. जर असे नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ तुर्तास मिळणार नाही.
वरील पक्रिया पूर्ण करण्यास शेतकऱ्यांना काही कालावधी देण्यात आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी वरील पूर्ण करावी, ज्यामुळे पात्र व अपात्र शेतकरी ठरवण्यात येतील. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जेव्हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल, त्यांनतर शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ दिवसानंतर मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिला हप्ता पाठवण्यात येईल. वरील माहिती वरिष्ठ कृषी विभागातील अधिकारांनी सूत्राद्वारे दिली आहे.
मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
प्रथम पंतप्रधान सन्मान निधी योजनेतंर्गत २०१९ पूर्वी जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत तुम्ही ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
लाभार्थाच्या नावावर शेत जमीन असणे अनिवार्य आहे.
बँक खात्याला आधारलिंक केलेले पाहिजे हे अनिवार्य आहे.
या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही
या शेतकऱ्यांनी ई केवायसी किंवा आधार लिंक प्रकिया पूर्ण केली नाही. असे ३६ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान योजनेअंतर्गत लाभ देण्याचे बंद करण्यात आले आहे. ७९ लाख शेतकऱ्यांना आता सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. पुन्हा याच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रथम मिळाले आहे.
शेतकऱ्यांना २६ हजार प्रति हेक्टर पिक विमा मिळणार | Farming Insurance
Farming Insurance : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा होतोय फायदा
शेतकऱ्यांना कर्ज माफी आता मिळणार | छत्रपती शिवाजी महाराज योजनेतंर्गत | Farming Insurance