Maharashtra Rain : 2 दिवस पावसाचा जोर वाढणार

Maharashtra Rain : 2 दिवस पावसाचा जोर वाढणार
Maharashtra Rain : 2 दिवस पावसाचा जोर वाढणार

 

Weather Update : राज्यातील काही भागात वादळी पाऊस पडत आहे. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने आजपासून पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला.

आजचा हवामान अंदाज | Maharashtra Rain

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईत काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. तर मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

उद्याचे हवामान अंदाज | Weather Update

उद्या म्हणजेच शनिवारी कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली. नगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

रविवारी विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड तसेच नगर, सोलापूर, सांगली आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकामी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Leave a Comment