Monsoon update : वादळी पावसाचाही अंदाज

Monsoon update : वादळी पावसाचाही अंदाज
Monsoon update : वादळी पावसाचाही अंदाज

 

Monsoon update : आज आणखी काही भागात मान्सून पुढे सरसावला. दिवसभराच्या विरामानंतर मान्सूनने पुन्हा सुरुवात केली. मान्सूनच्या प्रवासासाठी हवामान अनुकूल असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मान्सूनने आज मालदीव आणि कोमोरोस, श्रीलंका, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राचा पुढील भाग व्यापला आहे. तर संपूर्ण अंदमान निकोबार मान्सूनने व्यापलेला आहे. मान्सूनसाठी हवामान अनुकूल आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर व्यापेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र गेल्या तीन तासांपासून उत्तर-पूर्वेकडे सरकत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र ईशान्येकडे सरकण्याची शक्यता असून या कमी दाबाच्या क्षेत्राचे उद्या म्हणजेच २५ मे रोजी सकाळी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. रात्री त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तसेच, दक्षिण केरळमध्ये चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती कायम आहे.

राज्याच्या काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
इशारा: विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
विभागाने दिले. तर मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, नाशिक आणि जळगाव, धुळे, नंदुरबार आणि खान्देशात.
विदर्भातील अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आपला बळीराजा ; WhatsApp Group वर सामील होऊ शकतात..

PM Kisan Scheme : लोकसभा निवडणुकीनंतर 6000 रुपये मिळणार का?
PM Kisan Scheme : लोकसभा निवडणुकीनंतर 6000 रुपये मिळणार का?

Leave a Comment