Milk Price Issue : दूध उत्पादक महिलांचा आवाज, दुधाला 40 रुपये दर द्या

Milk Price Issue : दूध उत्पादक महिलांचा आवाज, दुधाला 40 रुपये दर द्या
Milk Price Issue : दूध उत्पादक महिलांचा आवाज, दुधाला 40 रुपये दर द्या

Milk Price Issue : महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक महिलांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेपेक्षा दुधाला किमान ४० रुपये प्रति लिटर दर देण्याची मागणी जोरदार होत आहे. या योजनेऐवजी सरकारने दुधाचे भाव वाढवून महिलांना योग्य आधार द्यावा, असे या महिलांचे मत आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र, या रकमेमुळे महिलांच्या गरजा पूर्ण होत नाहीत आणि दुधाचे भाव कमी असल्यामुळे त्यांना नफा मिळत नाही.

यामुळे अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून सरकारकडे निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणतात की, “आम्हाला भीक नको, तर दुधाला योग्य दर द्या.” महिलांच्या मते, सरकारने दुधाचे भाव ४० रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवून त्यांना आर्थिक आधार द्यावा. तसेच, दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ करून महिलांना अधिक नफा मिळवून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

दुग्ध उत्पादक महिलांच्या या आंदोलनाला अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या संघटनांनी सरकारला तातडीने महिलांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

दुग्ध उत्पादक महिलांच्या या प्रश्नावर लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Crop Insurance : 2000 वर शेतकऱ्यांची योजना अपूर्ण!
Crop Insurance : 2000 वर शेतकऱ्यांची योजना अपूर्ण!

PM Kisan Fund : पीएम किसानचा हप्ता आणखीन 2 हजाराने वाढणार शक्यता?
PM Kisan Fund : पीएम किसानचा हप्ता आणखीन 2 हजाराने वाढणार शक्यता?

Leave a Comment