Cotton Rate : देशात कापसाचे उत्पादन घटलेले आहे तसेच कापसाची निर्यात वाढली आहे. यामुळे देशात कापसाचे भाव तूफान वाढत आहे असे जाणंकरांच मत आहे. भारतात गेल्या दोन ते तीन दिवसात कापसाचे भाव ( Cotton Rate ) ८ हजार ८५०० पर्यंत पोहचले आहे.
कापसाचे भाव तूफान वाढले | Cotton Rate
महाराष्ट्र, राज्यस्थान, गुजरात मध्ये कापसाचे ८ हजार पासून ते ८ हजार ५०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. महाराष्ट्रातील अनेक बाजार समिती मध्ये कापसाचे भाव प्रति क्विंटल मागे ७५ ते १०० रुपयांनी वाढले आहेत. तसेच अनेक बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात वाढ झाली नाही. ७ हजार पासून तर ८ हजार पर्यंत कापसाला भाव दिला जात आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांन मध्येच गोंधळ निर्माण झाला आहे.
👇👇👇👀
घणसावंगी बाजार समिती मध्ये कापसाचा कमालीचा दर ८ हजार ५०० पर्यंत पोचहले होते. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कापसाचे भाव स्थिर असल्यामुळे कापसाचे टिकून असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पाकिस्तान आणि चीनसह इतर देश हळूहळू कापसाची आयात वाढत आहे. देशात कापसाचे उत्पादन हे घटले आणि दुसऱ्या बाजूने अनेक कंपन्याकडून कापसाची मागणी सुध्दा वाढत आहे. त्यामुळे भारतात कापसाचे ८ हजार पासून ते ९ हजार ५०० पर्यंत प्रति क्विंटल भाव राहण्याची शक्यता जांणकार सांगत आहे.
👇👇👇👀