Farming Insurance : भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून जगात ओळख निर्माण झाली आहे. ७० टक्के अन्न पुरवठा भारत देश जगात करत असतो. पण मार्च आणि एप्रिल महिन्यात भारतातील काही राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे, शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले समोर आले आहे.
मार्च महिन्यात आणि एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात गारपीट व जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच काही शेतकऱ्यांना आपला जीव गमवला लागला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, प्रति हेक्टर ५० हजार आणि फळबागांसाठी १ लाखापर्यंत मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारला धारेवर धरुन अजित पवार यांनी केली आहे.
एनडीआरएफच्या निकष्याची दुप्पट रक्कम मिळावी, ज्या शेतकऱ्यांना जीव गमवला लागला अशा शेतकऱ्यांच्या कुटूंबाना ४ लाख न देता ६ लाख पर्यंत आर्थिक मदत करावी. मागील खरीपात एनडीआरएफच्या निकषात थोडीशी रक्कम वाढली होती पण आता यावरती फेरविचार करुन सराकरने दुप्पट रक्कम करावी यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल अशी मागणी अजित पवार यांनी पत्र द्वारे केली आहे.
Farming Insurance : मार्च महिन्यातील 20 कोटीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात येणार