महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात दोन वेळेस गारपीठ झाल्याने, शेतकऱ्यांचे पिके मातीमोल झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढीव दरानुसार राज्य सरकार देणार अशी घोषणा शासन निर्णय द्वारा केली गेली आहे. पश्चिम विदर्भात १४ हजार ४५९ हेक्टर वरती ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तसेच यामध्ये २६ हजार १३२ शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहे.
सोमवारी २७ मार्च २०२३ मध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकारने शासन निर्णय द्वारे २४ कोटी ५८ लाखाची नुकसान भरपाई घोषित केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे अशा शेतकऱ्यांचे नावे पोर्टलवर जाहिर करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नावे यादीत असणार अशा शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई पाठवण्यात येणार आहे.
पश्चिम विदर्भात मार्च महिन्यात जवळपास ५ जिल्ह्यात गारपीटचा तडाखा शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळेस बसला आहे.
Farming Insurance : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख ते 50 हजार पर्यंत मदत तातडीने जाहिर
Farming Insurance : मार्च महिन्यातील 20 कोटीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात येणार