शेतकऱ्यांना दिलासा, महाराष्ट्रात कापसाचे भाव दबावत असून सुध्दा कापसाच्या भावात अकोला बाजार समिती अकोट येथे तेजी पाहयला मिळाली आहे. कापसाच्या भावात सुधारणा होत असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये कापसाचे भाव हे ९००० पर्यंत जातील अशी अशा वाढली आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच पांढर सोन म्हणून ओळखल जाणाऱ्या कापसाच्या भावात गेल्या दोन ते तीन दिवसात २६० रु रुपायांनी कमी दर झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अकोट येथे सोमवारी आणि मंगळवारी कापसाच्या भावात चढ उतार पाहयला मिळाला आहे. गुरुवारी अकोट बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात ९० वाढ झाल्यामुळे कापसाचे ८ हजार ६७० प्रति क्विंटल दर झाले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या आठवड्यापासून कापसाच्या भावात चढ उतर होत असल्यामुळे तज्ञांच्या मते, कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.
तुम्ही शेतकरी असाल तर whatsapp group बनवून या नंबरला ९६०४९९४४०६ whatsapp group वरती Add करा.