Aadhar Update : आधार अपडेट नसेल तर सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही

Aadhar Update : आता आधार वरती आपण राशन मिळवणे, बँकेतील पैसे काढणे, पुरावा म्हणून आधार सबमिट करतो असे इतर कारणासाठी आधार देतो. आधार वरती आपली माहिती अपूर्ण असल्यास आपणास सरकारी योजनेचा लाभ घेण्यास अडथळा येऊ शकतो. 

Aadhaar Update
Aadhaar Update

भारतामधील प्रत्येकाच्या आयुष्यात आधार कार्ड हे दिले जाते. आधार कार्ड वरती १२ अंकी नंबर असतो हा नंबर कधीच बदलून दिला जात नाही. त्याच नंबर वरती आपणास आधार कार्ड अपडेट करायाचे आहे. तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी POI आणि POA अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. POI आणि POA या पासून आधार वरली खरा पत्ता मानला जातो. POI आणि POA हे अपडेट करण्यासाठी ठोस पुरावा द्यावा लागतो म्हणजेच पॅन कार्ड, शाळेचा दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड असे कागद पत्रांचे पुरावे देऊनच अपडेट करता येते.

UIDAI याच्या माहिती नुसार, आधार हे अपडेट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही आधार अपडेट केले नाही तर तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घेताना खुप अडथळा येऊ शकतो. POI आणि POA हे अपडेट करण्यासाठी ऑनलाईन फी २५ राहिल तसेच बाहेरुन तुम्ही आधार अपडेट करत असला तर तुम्हाला ५० रुपये शुल्क राहिल.

आधार कार्ड वरती तुम्हाला दर दहा वर्षांनी बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक अपडेट करताना तुम्ही पत्ता, नाव, तारीख, मोबाइल इतर माहिती सुध्दा तुम्ही अपडेट करु शकतात. बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी शुल्क १०० लागतात यामध्ये तुम्ही अनेक माहिती भरु शकतात. 

महत्वाची सूचना : प्रत्येक व्यक्तीला एकच आधार क्रमांक दिला जातो. आधार क्रमांक १२ अंकी असतो, त्या यूनिक नंबर पासून आपण त्या व्यक्ती बदल माहिती पाहू शकतो. 

महत्वाची सूचना : आधार ( Aadhaar ) मधील आपण स्वताचे नावे हे दोन वेळेस बदलू शकतो.

Leave a Comment