Agricultural News : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात तूरीच्या भावात चांगलीच तेजी येत आहे. शेतकरी मित्रानो याही वर्षी तूरीला चांगलाच भाव असणार आहे. ही बातमी सविस्तर वाचा आपणास महत्वाची वाटली तर नक्की शेयर करा.
तूरीचे ( tur ) भाव वाढणार
सध्या भारतात तूरीची मागणी वाढली आहे तसेच तूरीच्या भावात वाढ झालेली पाहयला मिळत आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान केल होत त्यासोबत तूर उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचा चांगलाच फटका बसला होता.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात तूर लागवडीत मोठी घट या वर्षी पाहयला मिळाली आहे. त्यामुळे तूरीचे भाव पुन्हा एकदा तेजीत असणार आहे.
तूर लागवडीत मोठी घट
भारतात मागील वर्षी पेक्षा = ११.६७ % घट
क्षेत्रात घट = 5 लाख ५५ हजार हेक्टर
दर वर्षी कर्नाटकात तूरीचे पिक सर्वात जास्त घेतले जाते जातेपण यावर्षी तूर लागवडीत ८२ हजार हेक्टर क्षेत्रात घट पाहयला मिळाली आहे. यामुळे तूरीच्या भावात चांगलीच तेजी येणार आहे.
तेलगंणा = १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र कमी
महाराष्ट्रात = १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र कमी
भारतात गेल्या दोन वर्षापासून तूर उत्पादनात कमतरता निर्माण झाली आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात तूर उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान झाल आहे. म्हणून केंद्र सरकार आता आफ्रिकेतून तूर आयात या महिन्यात करणार आहे. या वर्षी तूर लागवड कमी आणि उत्पादन सुध्दा कमी होणार त्यामुळे तूरीचे भाव चांगलेच वाढणार आहे.