Agriculture : सोयाबीनचे भाव वाढणार का ?

Soybean Rate : मागील वर्षी भारतात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे सोयाबीनचे उत्पादन झालेच नाही. मागील वर्षी सोयाबीनला उच्चांकी भाव मिळून हि शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ मिळालाच नाही. मागील वर्षा सोडून इतर वर्षी सोयाबीनला योग्य भाव कधीच मिळाला नाही त्यामुळे शेतकरी मागे राहत आहे.

Agriculture
Agriculture

सोयाबीनचे भाव वाढणार २०२२-23

भारतासह अमेरिका, अर्जेंटीना, ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते. काही जाणंकारांच्या मते, ब्राझील आणि अर्जेंटीना मध्ये सोयाबीनचे पीक सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी अर्जेंटीना मध्ये पावसाची कमतरता निर्माण झाल्यामुळे सोयाबीन लागवड कमी झाली आहे. अर्जेंटीना मध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन लागवड झालीच नाही तसेच आता पर्यंत अर्जेंटीना मध्ये ३७ टक्केच सोयाबीन लागवड झाली पण हि लागवड मागील वर्षीच्या तुलनेत कमीच आहे.

अमेरिकाच्या कृषी विभागाचा अंदाज म्हणतो की, यावर्षी ब्राझील आणि अर्जेंटीना मध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड झाली तसेच यावर्षी सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. पण याच उलट काही जाणंकरांच्या मते, यावर्षी अर्जेंटीना मध्ये सध्या सोयाबीन लागवड चालू आहे. पण अर्जेंटीना मधील काही भागात पाऊस नसल्याने तेथील सोयाबीनची लागवड रखडलेली आहे. तसेच काही भागात पावसाची कमतरात सुध्दा निर्माण झाली म्हणजे यावर्षी अर्जेंटीना मध्ये दुष्काळ सारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी अर्जेंटीना मध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी राहण्याची दाट शक्यता आहे.

अर्जेंटीना मध्ये मागील वर्षी ४३९ लाख टन सोयाबीनच उत्पादन झाले होते. पण यावर्षी ५६ लाख टनांनी सोयाबीनचे उत्पादन वाढू शकतात असे जाणंकारांच मत आहे. अर्जेंटीनात सोयाबीन लागवड १६७ लाख पर्यंत करण्यात आली आहे. ब्राझील आणि अर्जेंटीनात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पाहता इतर देशांनी अर्जेंटीना मधील मागील हंगामातील सोयाबीन खरेदी केला आहे. अर्जेंटीनामधील दुष्काळ 

स्थिती पाहता चीन सुध्दा सोयाबीन खरेदी करण्यासाठी तयारी करत आहे. आतापर्यंत अर्जेंटीनाने मागील हंगामातील सोयाबीन ७५ टक्के विकाला आहे.

भारतासह अर्जेंटीना, अमेरिका तसेच ब्राझील मध्ये सुध्दा सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनच्या भावात सुधारणा पाहयला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे भाव वाढले तर भारतातील बाजारपेठेत सुध्दा सोयाबीनच्या दरात सुध्दा सुधारणा पाहयला मिळणार, असे मत जाणंकरांच आहे.

Leave a Comment