Agriculture Insurance : 14 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

Agriculture Insurance : 14 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
Agriculture Insurance : 14 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

 

Agriculture Insurance : जून आणि जुलै महिन्यात तब्बल 14 लाख शेतकऱ्यांचे शेती पिकांची नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य सरकारने 1000 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यात बहुतांश भागात तब्बल महिनाभर पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन घटले तसेच काहींची पिके जळून गेली आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी हा निधी मंजूर केला गेला आहे.

या जिल्ह्यात नुकसान भरपाई मिळणार | Agriculture Insurance

जून आणि जुलै महिन्यात छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या विभागात कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली होती. या नुकसानीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. तसेच राज्य सरकारने या प्रस्तावास मंजुरी सुद्धा दिली आहे. अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये तब्बल जून आणि जुलै मध्ये 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे.

लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. अमरावती विभागात तब्बल सात लाख 63 हजार 23 शेतकरी तसेच छत्रपती संभाजी नगर मध्ये सहा लाख 46 हजार 295 शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान झाले होत. अमरावती विभागासाठी 557 कोटी 26 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर साठी 435 कोटी 74 लाखाची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.

Farming Insurance : शेतकऱ्यांनसाठी 204 कोटीचा निधी मंजूर

जून आणि जुलै महिन्यात छत्रपती संभाजी नगर आणि अमरावती विभागात 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना आर्थ‍िक मदत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यांसाठी मदत जाहीर झालेली आहे. तसेच अमरावती विभागात अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे 

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार | Agriculture Insurance

छत्रपती संभाजीनगर विभाग शेतकरी निधी
जालना २८२ ३३ लाख ५९ हजार
परभणी २०१ २७ लाख ७५ हजार
हिंगोली २७ हजार ७४२ १४ कोटी ५४ लाख २८ हजार
नांदेड ६ लाख १७ हजार ९११ ४२० कोटी ४६ लाख ६१ हजार
बीड १२७ ९ लाख ६४ हजार
लातूर ३२ २ लाख ९२ हजार
     

 

अमरावती विभाग शेतकरी  
अकोला २ लाख ५७१ १४४ कोटी २८ लाख
यवतमाळ २ लाख ६३ हजार  
बुलढाणा १ लाख ४८ हजार ४२३ ११५ कोटी ४० लाख
वाशीम ६० हजार १६५ ४७ लाख १४ हजार ७१८
अमरावती ९० हजार २५५ ६५ कोटी ३३१ लाख ९१ हजार

 

आपला बळीराजा : WhatsApp Group सामील होऊ शकतात.

Agriculture Insurance : 151 कोटी पर्यंत नुकसान भरपाई मंजूर
Agriculture Insurance : 151 कोटी पर्यंत नुकसान भरपाई मंजूर

Leave a Comment